उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानेच मे. रिशु किचु इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ला कामाची वर्क ऑर्डर मिळाली - राजेभाऊ फड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने खोटी माहिती दिली


उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानेच मे. रिशु किचु इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ला कामाची वर्क ऑर्डर मिळाली - राजेभाऊ फड 


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने खोटी माहिती दिली


परळी प्रतिनिधी.         सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही परळी नगर परिषदेतील वर्क ऑर्डर अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिल्याने मे.रिशु किचु इंडस्ट्रीज प्रा.लि.कंपनीला कामाची वर्क ऑर्डर मिळाल्याचे रासपाचे प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
     राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (
अजित पवार गट) यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत असे सांगितले की, आम्हाला 10 कोटीच्या कामाची वर्क ऑर्डर दिलेली आहे परंतु हे सर्व खोटी माहिती आहे या बाबतीत सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे :- 
कामाचे नाव :- नगर परिषद परळी वैजनाथ यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत परळी शहरात मुख्य रस्त्यावर कोनिकाल पोल पुरवठा करून उभारणी करणे. 
        हि निविदा  मार्च २०२४ मध्ये निविदा प्रकाशित करण्यात आली. 
निविदा रक्कम :- ८,१३,००,४५५/-
निविदा उघडल्याचे तारीख :- २२ एप्रिल २०२४
निविदेमध्ये मे . रिशू किचू इंडस्ट्रीज प्रा . लि . यांचे सर्वात कमी दराची निविदा 
वर्क ऑर्डर देण्यास टाळाटाळ केल्यामुळे दिनांक ११ जुलै २०२४ रोजी नगर परिषदेस वर्क ऑर्डर देणे बाबत लेखी पत्र देण्यात आले  
तरी पण नगर परिषदेकडून कोणतेही उत्तर नाही म्हणून १८ जुलै २०२४ रोजी मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांच्याकडे याचिका दाखल केली . आम्ही दाखल केलेल्या याचिकेची दाखल घेऊन   मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी नगर परिषद परळी वैजनाथ यांना २२ जुलै २०२४ रोजी  आदेशित केले की  मे . रिशू किचू इंडस्ट्रीज प्रा . लि. ला तात्काळ वर्क ऑर्डर देणे. मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांच्या आदेशाची प्रत नगर परिषद परळी वैजनाथ यांना दिनांक २५ जुलै २०२४ रोजी दिल्यानंतर हि नगर परिषद ने तब्बल १८ दिवसांनी आम्हाला सदर कामाची वर्क ऑर्डर दिली असल्याचे राजेभाउ फड यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने