परळी मार्केटमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लूट? बाजार समितीने लक्ष देण्याची मागणी
परळी प्रतिनिधी. परळीच्या मार्केटमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुट करण्यात येत असून हमीभावापेक्षा शेतकऱ्यांकडून कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने जाहीर केलेल्या दराप्रमाणे तरी किमान सोयाबीन विक्री व्हावी याकरिता परळी कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अद्यापही शासनाचे सोयाबीन हानिकेंद्र सुरू झालेले दिसून येत नाहीत.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य सरकारने यावर्षी 2024 सोयाबीन पिकासाठी 4900 हमीभाव जाहीर केलेला आहे. सध्या शेतकरी आपल्या शेतातील काढलेली सोयाबीन परळीच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन येत आहेत .परंतु सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने काही आडतदार व व्यापारी शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करत असल्याचे समजते. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनचे चांगले पीक घेऊनही त्यांच्या मालाला भाव मिळत नाही .
याप्रकरणी परळी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे सोयाबीनच्या पिकाला भाव मिळावा व किमान शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तरी निघावा अशी चर्चा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान अगोदरच सोयाबीनला म्हणावा तसा किमान भाव नसल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे.
टिप्पणी पोस्ट करा