भाजपा सेना सापनाथ तर काँग्रेस - राष्ट्रवादी नागनाथ यांच्यापासून समान अंतर ठेवुन वंचित आघाडीला साथ द्या -- मिलिंद घाडगे
परळी प्रतिनिधी. भाजपा सेना सापनाथ तर कांग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस नागनाथ आहेत.त्यांच्या पासून बहुजन समाजाने अंतर ठेवून वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी असे आवाहन वंचितचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी केले.ते दिनांक 26 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मतदार संपर्क अभियान अंतर्गत नागपूर सर्कल मध्ये बोलत होते.
यावेळी राजेश सरवदे, प्रेम जगतकर, संतोष वावळे यांच्या उपस्थितीत उत्साहात बैठक पार पडले. यावेळी वंचित चे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी मतदार बांधवांशी संवाद साधताना सांगितले की सेना बीजेपी हे हिंदुत्ववादी पक्ष आसुन आंबेडकरी चळवळीच्या उघड उघड विरोधात आहेत. यांच्याशी चार हात करता येतील. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीने पुरोगामीत्वाचे ढोंग करून आतापर्यंत आंबेडकर वाद्यांना फसवले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या करणी आणि कथणी मध्ये प्रचंड विरोधाभास आसुन सांगायचे एक आणि करायचे दुसरेच हे दुटप्पी धोरण गेल्या 70 वर्षांपासून चालू आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
विचाराने चालतो बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही जिवाचं रान करतो म्हणायचं आणि तीच राज्यघटना कमजोर करण्यासाठी खाजगीकरणाचे धोरण राबवायचं. आरक्षणाच्या माध्यमातून मागासवर्गीयांना विकासाची संधी मिळाली. हक्क अधिकार मिळाले हे हक्क अधिकार हिरावून घ्यायचे. आणि हक्क अधिकारासाठी लढणाऱ्या आंबेडकरी चळवळीचा राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडीला राजकारणात उभाच राहू द्यायचे नाही अशा पद्धतीचे वातावरण तयार करायचे.
विचाराने चालतो बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही जिवाचं रान करतो म्हणायचं आणि तीच राज्यघटना कमजोर करण्यासाठी खाजगीकरणाचे धोरण राबवायचं. आरक्षणाच्या माध्यमातून मागासवर्गीयांना विकासाची संधी मिळाली. हक्क अधिकार मिळाले हे हक्क अधिकार हिरावून घ्यायचे. आणि हक्क अधिकारासाठी लढणाऱ्या आंबेडकरी चळवळीचा राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडीला राजकारणात उभाच राहू द्यायचे नाही अशा पद्धतीचे वातावरण तयार करायचे.
जो स्वाभिमानी नेता सहजासहजी गळाला लागत नाही अशा कणखर बाणा असलेल्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात षडयंत्ररचून या नेतृत्वाचं चारित्र्य हनन करून बदनाम करायचं हे जुनंच धोरण काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांचं चालू आहे. मागासवर्गीयांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात जेवढे अन्य अत्याचार झाले प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षणाचे बाजारीकरण झालं एवढी मोठी मागासवर्गीयांची हानी कुठल्याच सरकारमध्ये झाली नाही. आपल्या समाजातील काही प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेले डॉ.बाबासाहेबांनी आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊन स्वतःची घर भरणाऱ्या डुप्लिकेट बुद्धिजीवी लोकांकडून अपप्रचार केला जातोय वंचितला मतदान केले तर भाजप निवडून येईल म्हणून आपण काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करावे. असा बुद्धिभेद करणाऱ्यांच्या नादाला न लागता समाजाने यांना ठोकून काढावे असे प्रखर आवाहन मिलिंद घाडगे यांनी केले.
या अभियानात वंचित बहुजन आघाडीचे ता. युवा अध्यक्ष राजेश सरवदे, युवा शहराध्यक्ष प्रेम जगतकर, युवा ता. उपाध्यक्ष संतोष वावळे हे उपस्थित होते. अभियानादरम्यान नागपूर सर्कलच्या मतदार बांधवांनी उत्साह पूर्ण वातावरणात अभियानाचे स्वागत केले.
टिप्पणी पोस्ट करा