गावाच्या प्रश्नावर पत्रकार प्रकाश चव्हाण मैदानात गणेश देवकते यांच्या आमरण उपोषणात सहभाग
परळी प्रतिनिधी
परळी तालुक्यातील वडखेल ते वडखेल तांडा अप्रोच रस्त्यासाठी मंजुर असलेले पाच लाख रुपये काम न करताच अधिकारी व गुत्तेदारांनी संगणमत करून उचलले आहेत. पैसे उचलणारा वर कारवाई करावी व रस्त्याचे काम करावे या मागणीसाठी वडखेल येथील ग्रामपंचायत समोर राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते गणेश देवकते यांचे दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरूच आहेत. गावाच्या या प्रश्नावर पत्रकार प्रकाश चव्हाण सुद्धा मैदानात उतरले असून देवकते यांच्यासोबत गावकऱ्यावर बोलते उपोषणा सहभागी झाले आहेत. प्रशासना विरूद्ध गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
बीड जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत वडखेल ते वडखेल तांडा रस्त्याच्या मजबूती करणासाठी पाच लक्ष रुपयांचा निधी सन २०२३ ते २०२४ च्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीच्या नियोजनातून मंजूर करण्यात आला होता. सदरील रस्त्याचे काम कसल्याही प्रकारचे न करता शासनाचा निधी गुत्तेदार व अधिकारी यांनी संगणमत करुन उचलून घेतला आहे. रस्त्याचे काम न करता अधिकारी यांच्या सगंमताने गुत्तेदार यानी बनावट एमबी तयार करून पूर्ण बिल उचलून घेतले आहे. सबंधीत रस्ता न करता वडखेल ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. शासनाच्या पाच लक्ष रुपये निधी उचलून शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणातील दोषी असणाऱ्या अधिकारी व सबंधित एजन्सी गुत्तेदार यांच्यावर भ्रष्टचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. शासनाने मंजूर केलेल्या रस्त्याचे काम तात्काळ करावे व गुत्तेदारावर कारवाई या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष गणेश देवकते यांनी शुक्रवारी (ता.१३) सकाळी दहा वाजता परळी तालुक्यातील वडखेल ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. शनिवार (ता.१४) दुसऱ्या दिवशीही गणेश देवकते यांचे आमरण उपोषण सुरुच आहे. दोन दिवसा पासून उपोषण सुरु असल्याने वडखेल ग्रामस्थांमध्ये प्रशासना विरूद्ध रोष निर्माण होत आहे. गणेश देवकते यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा