राष्ट्रीय संत भगवान बाबांनी घालून दिलेल्या आदर्शावर प्रत्येक गणेश मंडळानी समाजोपयोगी उपक्रम राबवावे -राजेश गिते

राष्ट्रीय संत भगवान बाबांनी घालून दिलेल्या आदर्शावर प्रत्येक गणेश मंडळानी समाजोपयोगी उपक्रम राबवावे -राजेश गिते

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राष्ट्रीय संत भगवान बाबांनी समाजाप्रती समाज कार्याचा आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे.गणेश उत्सव असेल किंवा इतर उपक्रम असतील या प्रसंगी समाजाला अभिप्रित असलेलेच उपक्रम राबविले पाहिजेत असे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथ गड पांगरी संचालक तथा भाजपा नेते राजेश गिते यांनी बेलंबा येथे विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रसंगी सांगितले.

आज शनिवार दि.14 रोजी मौजे बेलंबा (नेहरू नगर)तालुका परळी वैजनाथ येथे जय भगवान  युवा गणेश मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथ गड पांगरी संचालक तथा भाजपा नेते राजेश गिते यांच्या हस्ते करण्यात आले.
    हनुमान मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात राजेश गिते आणि विविध मान्यव
र यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.या वेळी मनोगत व्यक्त करताना राजेश गिते म्हणाले की राष्ट्रीय संत भगवान बाबा यांनी जो आदर्श समाजापुढे ठेवला त्याच त्वावर जय भगवान  युवा गणेश मंडळ यांनी समाजासाठी उपयुक्त कार्यक्रम हाती घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला आहे.
लोकमान्य गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सव सुरू करताना आठरा पगड जाती कशा एकत्र येतील असे प्रयत्न केले.
नेहरू नगर बेलंबा येथे सुध्दा अठरा पगड जाती वास्तव्य करतात.आर्थिक परिस्थिने जरी वस्तीवरील लोक गरीब असले तरी मनाने फार मोठे आहेत असे उद्गार राजेश गिते यांनी काढले.
  या गणेश मंडळांचा आदर्श सर्व गणेश मंडळांनी घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबवावेत असे मत राजेश गिते यांनी व्यक्त केले.बक्षीस वितरण समारंभास मला बोलावून भव्य दिव्य सत्कार केल्या बद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.या प्रसंगी ह भ प सचिन महाराज गिते यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
या बक्षीस वितरण समारंभ नंतर जय भगवान युवा गणेश मंडळाच्या गणरायाची आरती राजेश गिते यांच्या हस्ते करण्यात आली.
या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ह भ प सचिन महाराज गिते, पोलिस अधिकारी राजेभाऊ शेळके, बेलंबा गावच्या मा सरपंच उर्मिला ताई गिते, जेष्ठ नागरिक प्रल्हाद गिते (अण्णा ), शालेय समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण होळंबे, आदर्श शिक्षक नामदेव गिते सर आदि उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय भगवान  युवा गणेश मंडळ सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने