वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास निधीतील टेंडर विरोधात हायकोर्टात याचिका दाखल - राजेभाऊ फड अंबानी, अदानी आले तरीही टेंडर भरू शकत नाहीत अशी अवस्था केल्याचा आरोप

वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास निधीतील टेंडर विरोधात हायकोर्टात याचिका दाखल - राजेभाऊ फड 

अंबानी, अदानी आले तरीही टेंडर भरू शकत नाहीत अशी अवस्था केल्याचा आरोप 

परळी प्रतिनिधी.       राज्य शासनाच्या वतीने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ मंदिराच्या विकासासाठी व तीर्थक्षेत्र विकासासाठी 286 कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतील स्वागत कमानी व मेरुगिरी  पर्वतावरील दुरुस्ती यासाठी सुमारे 54 कोटी रुपयांचे टेंडर परळी नगर परिषदेने काढले आहेत. परंतु हे टेंडर अंबानी, अदानी सारखे उद्योगपती जरी आले तरी त्यांना टेंडर भरता येऊ नये अशी अवस्था केल्याचा आरोप राजेभाऊ फड यांनी पत्रकारांशी बोलताना केला.हे टेंडर इतरांनाही भरता यावे यासाठी  आपण औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. 
       राजाभाऊ फड यांनी त्यांच्या  निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ते म्हणाले की, वैद्यनाथ तीर्थ
क्षेत्र विकास निधी अंतर्गत परळी शहरात येणाऱ्या बाहेरील भाविक भक्तांसाठी 16 कोटी रुपयांच्या कमानी उभारणीचे टेंडर काढण्यात आले आहे. तसेच मेरूगिरी  पर्वतावरील दुरुस्ती कामासाठी 40 कोटी रुपयांचे टेंडर परळी नगर परिषदेने काढले आहे. परंतु सदर टेंडर दीक्षित नावाच्या क्लर्क शिवाय कोणालाही भरता येऊ शकत नाही अशी जाणीवपूर्वक व्यवस्था केल्याचेही ते म्हणाले. 
     या 40 कोटी रुपयांच्या टेंडर विरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून येत्या 18 सप्टेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. परळी शहरात गेल्या साडेसात वर्षाच्या काळात 900 कोटी रुपयांचा निधी आला. परंतु त्यापैकी 400 कोटी रुपये बोगस कामे करून उचलल्याचा आरोप करताना याविरुद्ध आपण मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले. 
     दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आपण लवकरच जाहीर प्रवेश करणार असल्याचे राजेभाऊ फड यांनी सांगितले. याबरोबरच कृषीमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात बोगस पिक विमा रॅकेट आहे. याप्रकरणी 16 लाखावर गुन्हे दाखल होऊनही अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही . सर्वसामान्यांच्या हाताला का मिळावे. काम न करता बिले उचलणे बंद झाले पाहिजे. असेच शहरातील इतर गुत्तेदारांनाही काम मिळावे यासाठी आपण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने