परळी येथे 'पुणे करार: गाभा आणि वर्तमान स्वरूप ' विषयावर अभ्यासवर्गाचे अयोजन फुले-आंबेडकरी अभ्यासक डॉ शशिकांत पट्टेकर यांचे रविवारी अभ्यास वर्ग

परळी येथे 'पुणे करार: गाभा आणि वर्तमान स्वरूप ' विषयावर  अभ्यासवर्गाचे अयोजन 

फुले-आंबेडकरी अभ्यासक डॉ शशिकांत पट्टेकर यांचे रविवारी अभ्यास  वर्ग

परळी/ प्रतिनिधी 

स्टुडंट्स फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी आणि फुले-आंबेडकरी अभ्यास समूहाच्या वतीने रविवार दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजता सम्राट अशोक सभागृहात प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाच्या बाजूला थर्मल कॉलनी येथे 'पुणे करार (२४ सप्टेंबर १९३२) : ' गाभा आणि वर्तमान स्वरूप'  किंवा पुणे कराराचा  धिक्कार वारंवार का करावा ?  या विषयावर विशेष साप्ताहिक अभ्यास  वर्गाचे आयोजन करण्यात आले असून फुले-आंबेडकरी अभ्यासक डॉ शशिकांत पट्टेकर  हे या अभ्यास वर्गाला  मार्गदर्शन करणार आहेत.
उद्घाटक म्हणून परळी विद्युत केंद्रांचे सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड तर संभाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक अनिल शिंदे
यांची विशेष उपस्थितीत असणार आहे,तर प्रमुख अतिथी म्हणून मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे बी .एल वडमारे, उपकार्यकारी अभियंता शिवाजी होटकर, अँड कपिल चिंडालिया, लक्ष्मण वैराळ यांचीही उपस्थिती असणार आहेत. 

पुणे करार ला ९२ वर्षे पूर्ण होत आहेत. आजही बऱ्याच मोठ्या प्रमाणात पुणे करार बद्दल अज्ञान असल्याचे दिसते, अनुसूचित जाती (पूर्वश्रमीचे अस्पृश्य) व अनुसूचित जमाती ( पूर्वाश्रमीचे आदिवासी ) यांच्यावर हा
पुणे करार लादून , त्यांच्यामध्ये व्यवस्थेचे चमचे ,दलाल निर्माण केले. हा परिणाम बिगर राजकीय क्षेत्रांमध्ये देखील निर्माण करण्यात आला आहे तसेच पुणे कराराचा सिद्धांत पुणे करार न करता देखील अन्य मागासवर्गीय समाजास देखील लागू करण्यात आला आहे . अशा परिस्थितीत त्याचे वर्तमान स्वरूप व्यवस्थित समजून घेण्यासाठी हा विषय चर्चेला घेण्यात आला आहे तरी या अभ्यास वर्गास जास्तीजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भगवान साकसमुद्रे, श्रीकांत इंगळे, संपादक नितीन ढाकणे, आकाश देवरे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने