व्यवसायिक पोखरकर यांचा घात की अपघात?
परळी: शहरातील व्यवसायिक मथुरा मल्टी सर्विसेस चे संचालक सचिन पोखरकर यांचा रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळला होता.पोखरकर यांचा मृत्यू हा घात की अपघात आहे अशी चर्चा जनतेतून होत आहे.
येथील मथुरा मल्टी सर्व्हिसेस चे चालक सचिन पोखरकर यांचा गुरुवारी रात्री च्या सुमारास परळी गंगाखेड मार्गावरील रेल्वे रुळाजवळ सिमेंट फॅक्टरी परिसरात मृतदेह आढळून आला.या परिसरात त्यांची मोटरसायकल ही पोलिसांना दिसून आली असल्याचे समजते.शुक्रवारी सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सचिन पोखरकर यांचा अचानक रेल्वेरुळा नजिक मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
. .
ही आत्महत्याची घटना असावी . रेल्वेखाली आल्याने त्यांच्या डोक्यास जबर जखम झाली व पायाच्या मांडीचा भाग फॅक्चर झाल्याचा प्राथमिक अंदाज परळी ग्रामीण पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी रात्री अकरा वाजण्यापूर्वी ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.रात्री अकराच्या सुमारास परळी ग्रामीण पोलिसांना रेल्वे रुळावर अपघात झाल्याची माहिती कळाली .लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रमेश तोटेवाड,जमादार पवार व वाहन चालक मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. व सचिन पोखरकर चा मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात रात्री आणण्यात आला.

शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली. येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळ सचिन पोखरकर यांचे मथुरा मल्टी सर्विसेस नावाने दुकान आहे.मृत्यूसमयी त्यांचे वय 40 वर्ष आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी ,आई ,वडील, भाऊ असा परिवार आहे.सचिन पोखरकर यांनी आत्महत्या केली, की त्यांचा घात झाला या विषयी चर्चा सुरू आहे. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा