सरकारी पांदण रस्त्यावरील अतिक्रमण काढावे या मागणीसाठी मोहा ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस

सरकारी पांदण रस्त्यावरील अतिक्रमण काढावे या मागणीसाठी मोहा ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू 

आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस 


परळी प्रतिनिधी.       तालुक्यातील मौजे मोहा येथील सरकारी पांदण रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे गावकऱ्यांना अडचण होत असल्याने व रहदारीचे दृष्टीने आवश्यक असलेल्या या रस्त्यावरील अतिक्रमण प्रशासनाने त्वरित काढावे या मागणीसाठी मोहा येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान उपोषणाचा दुसरा दिवस असून अद्याप तहसील प्रशासनाने यावर तोडगा काढलेला नाही. 
        याबाबत अधिक माहिती अशी की, मोहा येथे गावापासून एक किलोमीटर अंतरावर गावाकडे येणाऱ्या जाणाऱ्या सरकारी पांदण रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी ,शेतकरी सर्वांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. लहान मुले, महिला, वृद्ध पुरुष हे सुद्धा याच रस्त्याने ये जा करत असतात. परंतु या रस्त्यावर अतिक्रमण झा
ल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे. 
     सदरील अतिक्रमण हटवण्यात यावे व पांदण रस्ता मोकळा करावा याबाबत दिनांक 5 सप्टेंबर रोजी मोहा येथील ग्रामस्थांच्या वतीने परळी तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. या उपोषणात मोहा येथील  ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने