रस्त्याचे काम न करताच उचलले बील
कारवाई करावी या मागणीसाठी गणेश देवकते यांचे 13 सप्टेंबर पासुन उपोषण
परळी प्रतिनिधी
परळी तालुक्यातील वडखेल ते वडखेल तांडा अप्रोच रस्त्यासाठी मंजुर असलेले पाच लाख रुपये काम न करताच अधिकारी व गुत्तेदारांनी संगणमत करून उचललल्याचा आरोप करत पैसे उचलणारा वर कारवाई करावी व रस्त्याचे काम करावे या मागणीसाठी वडखेल येथील ग्रामस्थ १३ सप्टेंबर पासुन वडखेल ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन गणेश देवकते यांनी दिले आहे.
बीड च्या जिल्हाधिकारी यांना मंगळवारी (ता.३) निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत वडखेल ते वडखेल तांडा रस्त्याच्या मजबूती करणणासाठी पाच लक्ष रुपयांचा निधी सन २०२३ ते २०२४ च्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीच्या नियोजनातून मंजूर करण्यात आला होता. सदरील रस्त्याचे काम कसल्याही प्रकारचे न करता शासनाचा निधी उचलून घेतला आ
हे. रस्त्याचे काम न करता अधिकारी यांच्या सगंमताने गुत्तेदार यानी बनावट एमबी तयार करून पूर्ण बिल उचलून घेतले आहे. सबंधीत रस्ता न करता वडखेल ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. शासनाच्या पाच लक्ष रुपये निधी उचलून शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणातील दोषी असणाऱ्या अधिकारी व सबंधित एजन्सी गुत्तेदार यांच्यावर भ्रष्टचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. शासनाने मंजूर केलेल्या रस्त्याचे काम तात्काळ करावे या मागणीसाठी वडखेल ता. परळी वैजनाथ येथील सर्व लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ १३ सप्टेंबर २०२४ रोजी वडखेल ग्रामपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष गणेश देवकते यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित शासकिय यंत्रणेला देण्यात आले आहे. दरम्यान परळी तालुक्यात अशा प्रकारे अजूनही काही रस्ते असू शकतात जी की कामे न करताच गुत्तेदार आणि अधिकारी यांनी संगणमत करून दिले उचलले असावेत त्याचीही चौकशी होण्याची गरज आहे.
टिप्पणी पोस्ट करा