मुस्लिमांविरोधात भडकाऊ भाषण देणाऱ्या आमदार नितेश राणे विरोधात कलम 302 नुसार गुन्हा दाखल

मुस्लिमांविरोधात भडकाऊ भाषण देणाऱ्या आमदार नितेश राणे विरोधात कलम 302 नुसार गुन्हा दाखल 


परळी / प्रतिनिधी         मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेषीत महंमद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह शब्द वापरणाऱ्या तसेच मुस्लिम समाजाविषयी भडकाऊ भाषण देणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनला काल दिनांक 4 सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहिता कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल नितेश राणे विरोधात सकल मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.
     समस्त मुस्लिम समाजाविरुद्ध जातीय द्वेषातून भडकावू भाषण देणाऱ्या आमदार नितेश राणेला अटक करा अशी मागणी परळी येथील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिसांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना मुस्लिमांनी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती व अटक करण्याची मागणी केली होती.
      परळी येथे सकल मुस्लिम समाजाकडून परळी पोलिस ठाणे येथे नितेश राणेवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी काल दुपारी १२:३० वाजता पोलीस ठाणे समोर ठिय्या मांडला

होता.
  रामगिरी महाराज यांनी अखंड हरिनाम सप्ताह मौजे पचाळे ता. सिन्नर जि. नाशिक याठिकाणी सुरु असलेल्या सप्ताहाचे प्रवचन चालु असतांना प्रेषित महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह  वक्तव्य केले होते. रामगिरी महाराजांचा व्हीडीओ क्लीप व्हायरल होताच संपुर्ण देश भरात मुस्लिम समाज तर्फे निषेध मोर्चे अनेक ठिकाणी काढून महाराजवर FIR सुद्धा दाखल झालेली आहे.
    रामगिरी महाराजांना  अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. महाराजांच्या समर्थनार्थ  १ सप्टेंबर २०२४ रोजी भाजप आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्यात सकल हिंदू समाज आयोजित एका मोर्च्यात  आ.नितेश राणेनी भाषणात  मुस्लिम समाजाला टार्गेट करत शिविगाळ केली तसेच धमकी दिली आहे "मस्जिदों में आकर चुन-चुनकर मारेंगे" या मुळे मुस्लिम समाजात रोष असुन समाजाचे भावना दुखावले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नेहमी जातीय-धार्मिक तेढ वाढेल अशी प्रक्षोभक बेताल वक्तव्य नितेश राणे जाणूनबूजून करत असल्याचे मुस्लिम समुदयाने म्हटले आहे.
         परळी शहर  पोलिसांनी साजेद इब्राहिम सय्यद, राहणार जुने रेल्वे स्टेशन, परळी वैजनाथ यांच्या फिर्यादीवरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 302 351 (2), 353 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आमदार नितेश राणेवर भारतीय न्याय संहिता( बीएनएस) प्रमाणे गुन्हा नोंद करावा अशीही मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने