जया इगे राज्य शासनाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित
परळी प्रतिनिधी. परळी तालुक्यातील मलनाथपूर येथील सहशिक्षिका जया इगे यांना राज्य शासनाच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
काल दिनांक ५ सप्टेंबर २०२४, शिक्षकदिनी मुंबई येथे शासकीय भव्य अशा समारंभात राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर , राज्याचे शिक्षणमंत्री मा.ना.दीपक केसरकर , आमदार मा.ॲड. किरण सरनाईक , राज्याच्या शिक्षण सचिव मा. कुंदन मॅडम (IAS), राज्याचे शिक्षण आयुक्त मा. सुरज मांढरे साहेब, मा. विमला मॅडम (IAS) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातील जि.प.प्रा.शाळा मलनाथपूर, केंद्र -मोहा, तालुका-परळी येथील सहशिक्षिका श्रीमती जया
किसनराव इगे यांना महाराष्ट्र शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
किसनराव इगे यांना महाराष्ट्र शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
परळी तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात , सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहशिक्षिका जया इगे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
खुप खुप अभिनंदन मॅडमजी 💐🎊🎉🙏😊
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा