सरस्वती नदीवरील शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम ठरले अर्ध्या परळीकरांसाठी धोकादायक अतिवृष्टी झाल्यास अनेक वस्त्या कायमच जाणार पाण्याखाली

सरस्वती नदीवरील शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम ठरले अर्ध्या परळीकरांसाठी धोकादायक 

अतिवृष्टी झाल्यास अनेक वस्त्या कायमच जाणार पाण्याखाली 

परळी प्रतिनिधी.        सतत तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे परळी शहरातील मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या सरस्वती नदीवरील शॉपिंग कॉम्प्लेक्सचे  बांधकाम अर्ध्या परळीकरांसाठी धोकादायक बनले आहे. याचाच परिणाम अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी जाऊन सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले. तसेच संसारोपयोगी साहित्य उध्वस्त झाल्याने आर्थिक नुकसानही सहन करावे लागले आहे.
      याबाबत अधिक माहिती अशी की, परळी शहरातून वैद्यनाथ मंदिराच्या डोंगर भागातून परळी शहरात सरस्वती नदी वाहत येते.  या नदीवर आंबेवेस येथे एक पुल आहे.ज्याची उंची कमी आहे. तर पुढे त्याच पुलापासून ते मिलिंद विद्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या नदी पात्रात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीचे काम नगरपरिषद फंडातून करण्यात येत होते. सध्या हे काम बंद पडलेल्या अव
स्थेत आहे. तसेच झालेल्या कामाचे पडझड झालेली आहे. 
      या शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे नदी पात्रातील पात्राची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे जर सतत मुसळधार पाऊस पडला तर वेगाने पुराचे पाणी या नदीत न सामावून घेता ते जिकडे वाट मिळेल तिकडे शहरातील नागरी वस्त्यांमध्ये घुसत आहे. याचा प्रत्यय काल दिनांक 3  रोजी परळी शहराने अनुभवलेला आहे. शहरातील मिलिंद नगर, भिमानगर, गंगासागर नगर, बरकत नगर, जुना गाव भाग, फुकटपूरा, कृष्णा नगर, इंदिरानगर आदी वस्त्यांमध्ये हे पाणी शिरले. 
     या पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अनेकांना मध्यरात्री पावसाचे पाणी घरात घुसल्याने जिवीतास धोका निर्माण झाला होता.सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.परंतू आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.  सरस्वती नदीवरील शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे  पावसाळ्यात नेहमीच शहरातील अर्ध्या नागरिकांच्या जीवीतास कायम धोका आहे एवढे मात्र निश्चित.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने