अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी - भास्कर रोडे

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी - भास्कर रोडे 


परळी प्रतिनिधी.        काल नुकत्याच झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची उभी पिके उध्वस्त  झाली असून शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. अशा सर्व नुकसानग्रस्तांना  पंचनामे न करता राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी असे आवाहन रिपाईचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे यांनी केले आहे. 
     याबाबत अधिक माहिती अशी की, मराठवाड्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परळी तालुक्यातील व शहरातील,ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे जीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 
     तर परळी शहरात अनेक नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले
आहे. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पिकाचे पंचनामे न करता सरसकट क्षेत्रानुसार त्यांना आर्थिक मदत करावी. 
     याबरोबरच परळी शहरातील आणि ग्रामीण भागातील ज्या नागरिकांचे अतिवृष्टीमुळे घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे. घरातील संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले  आहे अशा सर्व नागरिकांनाही सरकारच्या वतीने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी रिपाईचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे, मराठवाडा अध्यक्ष प्रा. दासू वाघमारे, बीड जिल्हा सचिव दशरथ शिंदे आदींनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने