अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त तर परळीतील अनेक वस्त्या गेल्या पाण्याखाली तात्काळ पिक विमा व नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त तर परळीतील अनेक वस्त्या गेल्या पाण्याखाली 

तात्काळ पिक विमा व नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची  मागणी

 

परळी प्रतिनिधी.          गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार अतिवृष्टी होत आहे. काल रात्रभर झालेल्या संततधार  पावसामुळे परळी तालुक्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. तर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.दरम्यान कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना तात्काळ पीकविमा शेतकऱ्यांना देण्याचा आदेश द्यावा अशीही मागणी होत आहे.
   गेल्या तीन दिवसापासून मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत आहे. तालुक्यातील सर्व नदी, नाले, ओढे पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यातील चार पेक्षा अधिक बाह्य वळण रस्ते पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. तर शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस आणि सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. हाता तोंडाशी आलेले पिके उध्वस्त झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडल्याचे दिसत आहे. 
    तर परळी शहरातील भिमानगर, बरकत नगर, मिलिंद नगर,फुकटपूरा, गंगासागर नगर, जुना गाव भाग आदी भागातील ना
गरी वस्त्यांमध्ये सरस्वती नदीचे पुराचे पाणी गेल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी  साहित्य नष्ट झाले आहे. परळी उपविभागीय तहसील कार्यालय तसेच नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे . नुकसान झालेल्या नागरिकांच्या घराचे पंचनामे करून प्रशासनाने मदत देण्याची गरज आहे.
    दरम्यान सोयाबीन व कापूस पीक उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी  अनुदान किंवा पिक विम्याचे तात्काळ वाटप करावे अशी ही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान पीक पाहणी अहवालाची वाट न पाहता महसूल प्रशासनाने तात्काळ ग्रामसेवक व तलाठी यांच्या मदतीने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. तसेच महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना ताबडतोब मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागण  जनतेतून  होत आहे.
       शहरातील नागरी वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याचे लक्षात आल्यानंतर उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर तहसीलदार कांबळे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,न .प.चे.उपमुख्याधिकारी संतोष रोडे आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संकळी घटनास्थळी मदत कार्यासाठी दाखल झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने