परळी -बीड राष्ट्रीय महामार्गावरील पुल गेला वाहून यश कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाका..फुलचंद कराड

परळी -बीड राष्ट्रीय महामार्गावरील पुल गेला वाहून
     यश कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाका..फुलचंद कराड
परळी वैजनाथ दि.२५ (प्रतिनिधी)
         परळी - बीड राष्ट्रीय महामार्गावरील पांगरी येथील वाण नदीवरील तात्पुरत्या स्वरूपाचा पुल शनिवारी पहाटे आलेल्या पुरामुळे वाहून गेला यामुळे तब्बल राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ४८ तास खोळंबली आहे. यामुळे यश कन्ट्रक्शन व कार्यकारी अभियंता सुमंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)जेष्ट नेते फुलचंद कराड यांनी केली आहे.
                 परळी - बीड राष्ट्रीय महामार्गावरील पांगरी येथील वाण नदीवरील तात्पुरत्या स्वरूपाचा केलेला पुल भरावासह शनिवारी पहाटे आलेल्या पुरामुळे वाहून गेला. पहिल्याच पावसात पुल वाहून जाणार यासाठीजेष्ट नेते फु
लचंद कराड यांनी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच निवेदन दिले होते की, पावसाळ्याच्या तोंडावर पुलाचे काम सुरू करु नका या नदीचे पात्र मोठे आहे, या नदीला पाणी जास्त येते. यासाठी लिंबुठा ग्रामपंचायतीचा सुचनेचा ठराव दिला होता, पण कंपनीने फुलचंद कराड व लिंबुटा ग्रामपंचायतीच्या ठरावाची दखल न घेता तात्पुरत्या पुलाला दोन -तीनच पाईप टाकून थातूरमातूर भराव टाकला. व पुल पाडून कामाला सुरुवात केली. पहिल्याच मोठ्या पावसात पुल भरावासह वाहून गेला.सुदैवाने पहाटे पुल वाहून गेल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही कारण परळी - बीड महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. यामुळे दुर्घटना टळली आहे. पुल वाहून जावून जवळपास ४८ तास होवून गेले तरी वाहतूक सुरळीत झाली नाही, गुत्तेदार पुन्हा पहिले पाडेपंचावन्न करत असून पुन्हा पाईप कमी टाकून थातूरमातूर भराव टाकत आहेत याची पाहणी रविवारी फुलचंद कराड यांनी केली. यावेळी श्री कराड यांनी मागणी केली आहे की, यश कन्ट्रक्शनला काळ्मा यादीत टाकून कार्यकारी अभियंता सुमंत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी सरपंच सुधाकर बनसोडे, माजी सरपंच सुदामराव मुंडे, शरद गित्ते, अंगद मुंडे, ग्रामपंचायत सदस्य, रवी कराड, इंद्रमोहन मुंडे, विश्वनाथ मुंडे,महादेव कराड,विठ्ठल मुंडे, जयराम मुंडे, बाळासाहेब कराड, बालाजी कराड, सिद्धार्थ बनसोडे, गणेश मुंडे यांच्या सह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने