पुलाचा भराव वाहून गेला, यश कंट्रक्शनने काम प्रगतीपथावर असल्याचा बोर्ड लावला
परळी प्रतिनिधी. परळी बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 पांगरी जवळ चालू असलेल्या पुलाच्या बांधकामानजीक यश कंट्रक्शनने पर्यायी पुलाचा भराव टाकून रस्ता केला होता. हा रस्ता जोरदार पाऊस पडताच पुराच्या पाण्यामुळे होऊन गेला. आणि दोन्ही बाजूने वाहतूक थांबावावी लागली .वाहतूक थांबल्यानंतर टोकवाडी येथे यश कंट्रक्शनने काम प्रगतीपथावर असल्याचा तसेच नागापूर मार्गे बीड कडे जाण्याचा पर्यायी मार्ग वाहतूकदारांना दाखविला. मात्र भराव वाहून गेल्याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड परळी तेलगाव या राज्य रस्त्याचे काम यश कंट्रक्शन हे करीत आहेत. पांगरी जवळ यश कंट्रक्शन ने भराव घालून पर्यायी पुल निर्माण केला होता. हा पुल दिनांक 24 रोजी आलेल्या जोरदार पावसाच्या तडाख्यात होत्याचा नव्हता झाला.
आणि दोन्ही बाजूंनी येणारे वाहतूक प्रशासनाला थांबवावी लागली.
आणि दोन्ही बाजूंनी येणारे वाहतूक प्रशासनाला थांबवावी लागली.
प्रशासनाने पुलाचा भराव होऊन गेल्यानंतर टोकवाडी मार्गे बीड कडे जाणाऱ्या गाड्या मांडेखेल मार्गे बीड कडे वळवल्या तर बीड कडून येणाऱ्या परळी गाड्या मांडेखेल नागपूर मार्गे परळीकडे वळविल्या. बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे .या पावसाने यश कंट्रक्शन ला त्यांनी केलेल्या पुलाच्या भरावाच्या कामाची गुणवत्ता दाखवून दिले.
दरम्यान पुलाचा भराव वाहून गेल्यानंतर जी घटना घडली त्याचा उल्लेख करून यश कंट्रक्शनने तसा बोर्ड नागरिकांसाठी सावधानता बाळगण्यासाठी लावण्याची गरज होती. परंतु तसे न करता काम प्रगती पथावर आहे आणि आपणाला कोणत्या मार्गाने जावयाचे आहे हे मात्र सांगितले. यावरून पुलाचा भराव होऊन गेल्याचे लोकांना सांगणे म्हणजे आपले पितळ उघडे पडू नये अशी भूमिका तर यामागे नसावीना अशी जनतेतून चर्चा होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा