मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची ८ सप्टेंबर रोजी परळी येथे घोंगडी बैठक
परळी प्रतिनिधी
मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मतदार संघनिहाय घोंगडी बैठका होत आहेत. रविवार दि.८ सप्टेंबर २०२४ रोजी परळी येथे घोंगडी बैठक होणार आहे. त्यासाठी पूर्वतयारी ची बैठक श्रद्धा मंगल कार्यालय, परळी वैजनाथ येथे पार पडली. या बैठकीमध्ये घोंगडी बैठकीच्या तयारीसाठी ज्या प्रकारे नियोजन करावे लागणार आहे त्याबद्दल समाज बांधवांनी विस्तारित चर्चा व मंथन केले.
दरम्यान परळी मतदारसंघातील समाजातील लहान थोर, वडीलधारी मंड
ळी,महिला यांनी सहभागी व्हावे तसेच या विषयी प्रचार प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आल्या असून ही घोंगडी बैठक समाजाला दिशा देणारी असेल असा विश्वास या प्रसंगी समाज बांधवांनी व्यक्त केला. पूर्वनीयोजन बैठकीचे आयोजन श्रद्धा मंगल कार्यालय पावर हाऊस समोर करण्यात आले होते. परळी मतदार संघातील मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने या बैठकीला उत्स्फूर्तपने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा