जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी परळी नगर परिषदेच्या अधिकाऱी व कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी परळी नगर परिषदेच्या अधिकाऱी व कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू 


परळी प्रतिनिधी.    महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच त्यांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करावी आदी प्रमुख मागण्यासाठी परळी नगर परिषदेच्या अधिकारी संवर्ग व कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपास सुरुवात केली आहे .या संपामुळे  नगर परिषदेचे कामकाज ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले. 
      याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये 2005 नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करावी. संघटनेच्या निवेदनातील समस्या व ज्या काही मागणी आहेत त्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण कराव्यात, राज्यसंवर्ग पदे सातवा वेतन आयोग अधिसूचनेत पदांचा समावेश करून सेवार्थ नंबर देण्यात यावा, नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना 10,20,30  लागू करावी, पदोन्नती मधील कोट्यातील रिक्त पदे तात्काळ भरावीत या व इ
तर मागण्यांसाठी राज्यभर आज दिनांक 29 ऑगस्ट पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात करण्यात आला आहे. 
      या संपात परळी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. नगरपरिषद कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  ठिय्या मांडून या आंदोलनात सहभाग घेतला आहे. दरम्यान राज्य सरकारने नगरपरिषद कर्मचारी व अधिकाऱ्यांचा हा प्रश्न तात्काळ न  सोडविल्यास नागरिकांना मात्र अनंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने