75 वर्षीय वृद्ध मागासवर्गीय महिलेस लुटले, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
परळी प्रतिनिधी. तालुक्यातील हेळम येथे राहणाऱ्या एका 75 वर्षीय वयोवृद्ध मागासवर्गीय महिला दवाखान्यात उपचारासाठी गेल्यानंतर घरी परतत असताना रस्त्यात अडवून लूटमार केल्याची घटना काल दिनांक 29 ऑगस्ट रोजी हाळम येथे घडली आहे. याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील हेळम येथे राहणाऱ्या 75 वर्षीय केराबाई सिताराम लांडगे यांना पायास दुखापत झाल्यामुळे त्या हाळम येथील डॉ. परमेश्वर गुट्टे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेल्या होत्या. दवाखान्यात दाखविल्यानंतर तेथून सायंकाळी 5 वाजता घरी परत जात असताना रस्त्यात एकटीला गाठून राम महादेव फड, राहणार हाळम याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील फुले, आणि कुडके तोडून त्यांना धक्का बुक्की करून पसार झाला.
यावेळी कानातील फुले आणि कुडके तोडताना केराबाई सिताराम लांडगे
यांच्या कानास गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी केराबाई सिताराम लांडगे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलिसांनी राम महादेव फड, राहणार हाळम, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 309 (4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जाधव हे करीत आहेत. दरम्यान या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा