नाथ्रा गोळीबार प्रकरणी प्रकाश मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल

नाथ्रा  गोळीबार प्रकरणी प्रकाश मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल 


परळी प्रतिनिधी.   तालुक्यातील मौजे नाथरा येथे काल सायंकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणात प्रकाश मुंडे यांच्यावर आर्म अक्टसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    परळी तालुक्यातील नाथ्रा गावात काल दुपारी 3 वाजता  महादेव मुंडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने पुन्हा एकदा परळी तालुका हादरला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी आरोपी प्रकाश अशोक मुंडे यांच्या विरोधात कलम 109 ,115 ,352 ,351 (2), 351 (3) ,आर्म अक्ट 3/25 भादवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
      या प्रकरणाचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील हे करीत आहेत. दरम्यान परळी तालुक्यात गोळीबाराच्या  घटनांत वाढ झाली असून सर्वसामान्य जनता दहशतीखाली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन शहरातील अशा गावठी पिस्तूलधारकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने