मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 11 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा दौरा, मोठ्या संख्येने उपस्थित रहा - रवी नेमाने
परळी प्रतिनिधी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे 11 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून बीड येथे होणाऱ्या बैठकीस जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे वाहतूक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवी नेमाने यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात रवी नेमाने यांनी म्हटले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पुढील आठवड्यात ते मराठवाडा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात दिनांक 11 सप्टेंबर रोजी बीड येथील शासकीय विश्रामगृहात बीड जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. याप्रसंगी राज्याचे उपाध्यक्ष अशोक
तावरे, जिल्हाध्यक्ष सुमन धस, श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे आधी प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
तावरे, जिल्हाध्यक्ष सुमन धस, श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे आधी प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
तसेच कार्यकर्त्यांना राज ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने मार्गदर्शन करणार आहेत. तरी परळी तालुका तसेच बीड जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवहान रवी नेमाने यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा