21 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात भारत बंदचे आवाहन

21 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात भारत बंदचे आवाहन 

 

परळी प्रतिनिधी.      अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा आणि क्रिमिलियर लावण्याचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात 21 ऑगस्ट रोजी भारत बंद पुकारण्यात करण्यात आला आहे. या भारत बंद बाबत बहुजन समाज पार्टीच्या वतीने बीड जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच सिरसाळा येथील आंबेडकरी बांधवांच्या वतीने बंद पाळण्यात येणार आहे. अशी माहिती रामदादा किरवले यांनी दिली.
     याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मनोज नाना मस्के,रामदादा किरवले
यांनी बीड जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. मनोज मस्के यांनी म्हटले आहे की, नुकताच काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाचे वर्गीकरण करावे तसेच अनुसूचित जाती आणि जमातींना क्रिमीलेअर लागू करावे अशा प्रकारचा निकाल दिला आहे. या निकालामुळे अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणावर आणि विकासावर परिणाम होणार असल्याने संपूर्ण देशातील बहुजन समाज आक्रमक झाला आहे. 
   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने