21 ऑगस्ट च्या भारत बंद मध्ये आंबेडकरी विचारधारेच्या संघटनांनी सहभागी व्हावे - डॉ.अनंत गायकवाड
परळी प्रतिनिधी. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा आणि क्रिमिलियर लावण्याचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात 21 ऑगस्ट रोजी भारत बंद पुकारण्यात करण्यात आला आहे. या भारत बंदमध्ये महाराष्ट्रात बसपाचे प्रभारी मा.खा. रामजी गौतम व प्रदेशाध्यक्ष एडवोकेट सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली बसपा सहभागी होत आहे. परळी तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटनांनी व सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा बीड जिल्हा प्रभारी डॉ.अनंत गायकवाड यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दि
लेल्या पत्रकात डॉ. अनंत गायकवाड यांनी म्हटले आहे की, नुकताच काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाचे वर्गीकरण करावे तसेच अनुसूचित जाती आणि जमातींना क्रिमीलेअर लागू करावे अशा प्रकारचा निकाल दिला आहे. या निकालामुळे अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणावर आणि विकासावर परिणाम होणार असल्याने संपूर्ण देशातील बहुजन समाज आक्रमक झाला आहे.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री तथा बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी यांनी 21 ऑगस्टच्या भारत बंदचे आवाहन केले आहे. याबरोबर विविध पक्ष आणि संघटनांचाही या बंदमध्ये सहभाग आहे. परळी तालुक्यात 21 ऑगस्ट रोजी बंद पाळण्यात येईल आणि या बंदला तालुक्यातील विविध आंबेडकर पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन बसापचे प्रदेश सचिव तथा बीड जिल्हा प्रभारी डॉक्टर अनंत गायकवाड, जिल्हाध्यक्ष एडवोकेट अमोल डोंगरे, बीड प्रभारी अविनाश शिनगारे, बीड जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप ,बीड जिल्हा महासचिव सागर हनवते, प्रमोद मुळे, भीमराव शेळके, पांडुरंग घुमरे, गणेश टेकाळे, रतन साबळे, सिद्धेश्वर सुरवसे, रजनीकांत वाघमारे, कुमार फुलवारे, संतोष कांबळे, लक्ष्मीकांत कर्डिले, सिद्धार्थ जोगदंड, समाधान काळुंखे, संजय हराळे, विशाल साबळे आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा