महाराष्ट्रात यावर्षी पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा 15 ऑगस्ट गणेश विना

महाराष्ट्रात यावर्षी पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा 15 ऑगस्ट गणेश विना 

परळी ( रानबा गायकवाड)      महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका शाळा मधून शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींना राज्य शासनाच्या वतीने शालेय गणवेशाचे वाटप केले जाते. परंतु यावर्षी प्रथमच 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन शालेय गणवेश विना विद्यार्थ्यांना साजरा करावा लागणार आहे. 
       राज्यातील जिल्हा परिषद तसेच नगरपालिका, महानगरपालिका यांच्या शाळेमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर जून महिन्यातच दोन गणवेशांचे वाटप करण्यात येते. परंतु यावर्षी शाळा सुरू झाल्यानंतर तिसरा महिना लागला तरी अद्याप राज्य सरकारकडून शालेय विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. 
    उद्या दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशभर साजरा करण्यात येत आहे. परंतु राज्यातील लाखो जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथमच गणवेश विना स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणार आहे. राज्य शासनाने केलेल्या या दिरंगाईचा फटका मात्र सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसताना दिसत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने