समाज कल्याण विभागाअंतर्गत डॉ संतोष मुंडे यांच्या हस्ते 172 दिव्यांगांना प्रत्येकी 50 या प्रमाणे 86 लाखाच्या चेकचे वाटप शासनाच्या सर्व सोयी सुविधा दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवणार : डॉ संतोष मुंडे

समाज कल्याण विभागाअंतर्गत डॉ संतोष मुंडे यांच्या हस्ते 172 दिव्यांगांना प्रत्येकी 50 या प्रमाणे 86 लाखाच्या चेकचे वाटप


शासनाच्या सर्व सोयी सुविधा दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवणार : डॉ संतोष मुंडे


बीड  : प्रतिनिधी

समाज कल्याण विभाग बीड, जि प बीड व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल सप्ताह अंतर्गत,बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ संतोष मुंडे यांच्या हस्ते
जिल्ह्यातील 172 दिव्यांग बांधवाना, झेरॉक्स मशीन साठी 50 हजार याप्रमाणे एकूण 86 लक्ष रुपयांच्या चेकचे वाटप करण्यात आले.

दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम घेण्यात आला. दिव्यांग बांधव स्वावलंबी व्हावा हा या उपक्रमाचा उद्देश असून राज्यातील प्रत्येक दिव्यांग बंधू-भगिनींसाठी अहोरात्र प्रयत्न करून सर्व शासनाच्या सुविधा दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असणार असेही यावेळी डॉ संतोष मुंडे यांनी सांगितले.

समाज कल्याण अधिकारी जि प बीड व जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने, आयोजित महसूल सप्ता
ह अंतर्गत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री वासुदेव सोळंके (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बीड) तर प्रमुख पाहुणे म्हणून ,आर, एम शिंदे (जिल्हा समाज कल्याण अधिकारी बीड), श्री आठवले अशोक( महाराष्ट्र राज्य दिव्याग कर्मचारी संघटना), अशोक गंडले, श्रीमती शीला उजगरे श्री शाहू डोळस, रहीम शेख प्रहार प्रहार संघटना बीड नखाते अंकुश (वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक बीड) यांची यावेळी उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने