विशाळगड गजापूर प्रकरणी परळीत मुस्लिम समाजाचा भव्य निषेध मोर्चा संपन्न
परळी प्रतिनिधी. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड नजीक असणाऱ्या गजापूर गावात समाजकंटकांनी केलेल्या मोडतोड व हिंसाचार प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी परळीत मुस्लिम समाजाच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला
विशालगड पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गजापूर गावात जमावाकडून वस्तीवर हल्ला चढवला होता.यामध्ये अनेक वाहनांचे नासधूस करण्यात आली होती.या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी व गुन्हेगा
रांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज समस्त मुस्लिम बांधवाकडून भव्य मोर्चा काढण्यात आला.
रांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज समस्त मुस्लिम बांधवाकडून भव्य मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा नेहरू चौक, आझाद चौक मार्ग उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यामध्ये मुस्लिम बांधवांनी आपल्या हातावर काळी पट्टी बांधून जाहीर निषेध व्यक्त केला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नाही म्हणून पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
टिप्पणी पोस्ट करा