सिरसाळ्यात विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले
पोलीस काय करतायत? नागरिकांचा संतप्त सवाल
सिरसाळा प्रतिनिधी. शाळेसाठी निघालेल्या सावित्रीच्या लेकीची छेडछाड झाल्याची घटना काल सिरसाळ्यात घडली असून पोलिसांचा कोणताही धाक राहिला नसल्याने रोडरोमिओंचा सिरसाळ्यात सुळसुळाट झाला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शाळा, महाविद्यालयात जाणे अवघड झाले असताना शिरसाळा पोलीस काय करतायेत असा संतप्त सवाल सिरसाळा वासियाकडून होत आहे.
काल दिनांक 18 जुलै रोजी सकाळी सिरसाळा येथे शालेय विद्यार्थिनींची रोडरोमिओंने छेडछाड केली. सकाळची वेळ असल्याने नागरिकांची रस्त्यावर गर्दी कमी असते. याचा फायदा घेत मुलीची छेड काढली. दरम्यान या स्वतःचा बचाव करण्यासाठी विद्यार्थिनीने बचावासाठी पळ काढला. या घटनेने समस्त विद्यार्थी वर्गात पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे .
दरम्यान यापूर्वी अनेक वेळा विद्यार्थिनींनी नागरिकांनी पोलिसांना तक्रारी केलेले आहेत परंतु पोलिसांनी मात्र कोणतीच कारवाई केल्याचे दिसत नाही. यामुळे रोडरोमिओंना बळ मिळत आहे. पत्रकारांनी सुद्धा या प्रश्नी अनेक वेळा बातम्याच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. मुलींचे शिक्षणच धोक्यात येत असताना सिरसाळा पोलीस काय करतायेत? असा संतप्त
सवाल तमाम सिरसाळा व परिसरातील नागरिकांकडून पोलिसांना विचारला जात आहे.आता तरी पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाहीत.
सवाल तमाम सिरसाळा व परिसरातील नागरिकांकडून पोलिसांना विचारला जात आहे.आता तरी पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाहीत.
दरम्यान शाळा भरण्याच्या वेळी तसेच सुटण्याच्या वेळी शिरसाळा पोलिसांनी दक्ष राहिल्यास अशा घटना होणार नाहीत. या घटनेनंतर संबंधित शाळेचे शिक्षक व पालकांनी पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा