महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे अडकली,
तारीख वाढवून देण्याची पालकांची मागणी
परळी प्रतिनिधी. सध्या महाराष्ट्रातील महसूल कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी संप सुरू आहे. या दरम्यान अनेक शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू आहे .प्रवेशादरम्यान लागणारे कागदपत्रे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडकले आहेत
त्यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्ग वेळेवर कागदपत्र मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. संप कधी सुटेल याची शाश्वती नसल्याने विद्यार्थ्यांना लागणाऱ्या प्रमाणपत्र साठी शासनाने तारीख वाढवून द्यावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रातील महसूल कर्मचाऱ्यांचा सध्या संप सुरू आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालयामार्फत जातीचे, उत्पन्नाचे, नॉन क्रिमिलियर, रहिवासी, अधिवास अशा प्रकारचे अनेक प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेताना लागत असतात. संपामु
ळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळेनासे झाले आहेत. अनेकांनी पंधरा पंधरा दिवस झाले तरी त्यांना आवश्यक ती कागदपत्रे तहसील कार्यालयातून मिळत नसल्याने आता काय करायचे हा प्रश्न पालकांकडे उभा राहिला आहे.
ळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळेनासे झाले आहेत. अनेकांनी पंधरा पंधरा दिवस झाले तरी त्यांना आवश्यक ती कागदपत्रे तहसील कार्यालयातून मिळत नसल्याने आता काय करायचे हा प्रश्न पालकांकडे उभा राहिला आहे.
दुसरीकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असल्याशिवाय महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया पूर्ण करत नाहीत. अशा परिस्थितीत संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांनी, पालकांना त्यांची आवश्यक कागदपत्रे तहसील आणि उपविभागीय कार्यालयातून मिळावीत व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी संप लक्षात घेता राज्य शासनाने महाविद्यालयांना सदर कागदपत्रे देण्यासाठी पालकांना तारीख वाढवून द्यावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालक वर्गातून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा