परळी इंडिया व घटक पक्षाच्या वतिने उपविभागीय कार्यालयावर विशाळगड हिंसाचार प्रकरणी जोरदार निदर्शने

परळी इंडिया व घटक पक्षाच्या वतिने उपविभागीय कार्यालयावर विशाळगड हिंसाचार प्रकरणी जोरदार निदर्शने
 

परळी प्रतिनिधी.   विशाळगड (कोल्हापूर) येथील हिंसाचार घडवुन धर्मांत द्वेष पसरविणा-या समाज कंटकावर त्वरित कार्यवाही करण्यात येऊन त्वरित अटक करुन कडक शासन करा या मागणीसाठी परळी इंडिया घटक पक्षाच्या वतिने परळी उपविभागीय कार्यालयावर जोरदार निदर्शने व शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
   परळी उपविभागीय कार्यालयावर परळी इंडिया घटक पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने व शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत उपविभागीय अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगळ, गाजापुर येथील अतिक्रमनाच्या मुद्द्यावरून धार्मिक द्वेष पसरून दंगली घडवून हिंसाचार करण्यात आला आहे या घटनेत प्रशासन व पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी या धार्मिक हिंसाचार घटनेचा इंडिया घटक पक्षा तर्फे निषेध करण्यात आला.तसेच घ
टनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक शासश करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनिल मुंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हानिफ उर्फ बहादुरभाई,परळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचे शहर अध्यक्ष अँड जीवनराव देशमुख, काँ.अँड.परमेश्वर गित्ते, शहर उपाध्यक्ष सुभाष देशमुख, इतेशाम खतीब,राष्ट्रवादी गटाचे फेरोजभाई, जमील अध्यक्ष,काँग्रेस प्रवक्ते बद्दर भाई, अनुसूचित जाती जमातीचे परळी शहर अध्यक्ष दीपक शिरसाट,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सद्दाम भाई,सैय्यद वाजेब, इनामदार, सय्यद अमजद अदी इंडिया आघाडी व घटक पक्षाचे प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने