लाडकी बहीण योजनेत प्रत्येक बहिणीचे नाव येण्यासाठी अंगणवाडी सेविका सहकार्य करणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभागनिहाय नोंदणी शिबिरांचा शुभारंभ!
परळी प्रतिनिधी. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार साहेब,कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब व माजी मंत्री आ. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक 15 जुलै ते 26 जुलै दरम्यान परळीचे माजी नगराध्यक्ष व गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने परळी शहरात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे" प्रभागनिहाय नोंदणी कॅम्प सुरु झाले असून या शिबिरातून जास्तीत जास्त बहीणीनी नोंदणी करावी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रत्येक बहिणीला दरमहा 1500/- रुपये सन्मान निधी सुरु करुन द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे ना.धनंजय मुंडे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शहारतील सर्व अंगणवाडी सेविकांना निमंत्रित करण्यात आले होते,यावेळी अंगणवाडी सेविकांनी शहरातील सर्व शिबीरांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन याप्रसंगी दिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहराचा प्रत्येक पदाधिकारी,बुथ समिती, विविध आघाडी सदस्य हे प्रत्येक बहिणीची नोंदणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत करण्यासाठी कटिबद्ध असून सर्व प्रभागात एकूण 27 शिबिरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके,शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,बाल विकास प्रकल्प अधिकारी रामेश्वर मुंडे,माजी उपनगराध्यक्ष अय्युब पठाण,रविंद्र परदेशी,नगरसेवक अजिझ कच्छी,हाजी बाबा,रवी मुळे,अनंत इंगळे,पंडित झिंजूर्डे,महेंद्र रोडे,शंकर कापसे, सचिन मराठे, लाला खान पठाण,सुरेश नानावटे,मोईन काकर,दिपक कुरील,चंद्रप्रकाश हालगे,राजु भाई,निलेश सगट,अनंत ढोपरे,ऋषिकेश राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा