मोदीजी मराठवाड्यात आले अन् मराठा आरक्षणा विषयी न बोलताच निघून गेले
मराठा आरक्षणा विषयी पंतप्रधानांचे मौन आश्चर्यचकित करणारे - सेवकराम जाधव
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
वर्षानुवर्ष सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, जगाचे रेकॉर्ड ब्रेक करत सभा, बैठका, मोर्चे झाले, महाराष्ट्र सरकारला रात्र-रात्र मंत्रालयीन कामकाजासाठी जागावं लागलं आहे.
देशाचे पंतप्रधान मराठवाड्यात येतात आणि मराठा आरक्षणा विषयी एक शब्द सुद्धा काढत नाहीत. हि बाब आश्चर्यचकित करणारी असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कर्नाटकातील आरक्षणा विषयी आवर्जून बोलले पण मराठवाड्यातून सुरु झालेल्या आणि सम्पूर्ण देशाने पाहिलेल्या मराठा आरक्षण आंदोलना बाबत मराठावड्यात येऊन आपल्या देशाचे पंतप्रधान काहीतरी बोलतील अशी अपेक्षा असताना त्यांनी याविषयी मौन पाळलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलन जागतिक पातळीवर सर्वज्ञात आहे. या ल
ढ्यात हजारो मराठा तरुणांनी बलिदान दिले आहे. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत अख्खा मराठा समाज संविधानिक मार्गाने अखंडपणे लढत आहे. या गोष्टीची जाणीव असतानाही पंतप्रधान मात्र गरजवंत मराठ्यांच्या आंदोलना विषयी चकार शब्द बोलत नाहीत.

पंतप्रधानांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर असंवेदनशीलता दाखवत हेतुपुरस्करपणे पाळलेले मौन म्हणजे प्रशासनाची मराठा आरक्षण आंदोलनाविषयीची नकारात्मक मानसिकता आहे हे स्पष्टपणे दिसुन येते. ही आश्चर्यचकित करणारी बाब असल्याचे सेवकराम जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा