उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदान केंद्रावर सावलीचे नियोजन करावे - अशोक तावरे

उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदान केंद्रावर सावलीचे नियोजन करावे - अशोक तावरे

बीड प्रतिनिधी.       बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 13 मे रोजी होत असून उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदारांची सोय व्हावी यासाठी मतदान केंद्रावर सावलीचे नियोजन करावे असे आवाहन मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी केले आहे. 
     याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात अशोक तावरे यांनी पुढे म्हटले आहे की, सध्या तीव्र उन्हाचा कडाका वाढला आहे. तापमान 43 अंशापेक्षा जास्त पुढे गेले आहे. या वाढत्या तापमानामुळे सकाळी 11 नंतर घराबाहेर पडणेही नागरिकांना अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडतील हे सांगणे कठीण आहे. 
   त्यामुळे बीड जिल्हा प्रशासन, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांनी
या लोकशाहीच्या उत्सवात सावलीची सोय करण्यासाठी पुढे यावे. या बरोबरच उन्हाळ्यामध्ये पानपोईची सोय करणाऱ्या सामाजिक संस्था यांनीही सहभागी व्हावे. हे कार्य करीत असताना बॅनर, आपले नाव, फोटो न वापरता आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी स्वतः रामतीर्थ जि. प. शाळा बुथ क्रमांक 362 व ३६३ या दोन बुथवर सावलीचे नियोजन केले आहे. 
   या प्रसिद्धी पत्रकावर मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव काकडे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे, वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र नेमाने, वीरेंद्र भालेकर, सुरज जोगदंड, श्रीकृष्ण गायके, आकाश टाकळकर, दादा भराटे संतोष कैवाडे, बाबा पाटोळे, विशाल शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने