आमला येथील बौद्धांवरील हल्ला हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न - डॉ.अनंत गायकवाड
माजलगाव:- धारूर तालुक्यातील आमला ह्या गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत गावांतील जातीयवाद्यांनी बौद्ध समाजावर हल्ला करून दलित समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.या घटनेचा निषेध करीत आरोपींना अटक करण्याची मागणी बसापचे बीड लोकसभा अध्यक्ष डॉ. अनंत गायकवाड यांनी केली आहे.
२८ एप्रिल 2024 रोजी आमला गावात प्रति वर्षाप्रमाणे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणूकीत डिजेवर मनोज जरांगे पाटलांचे गाणे का वाजवत नाही.म्हणून गावातील सुदर्शन अशोक ऊर्फ गोरख सोळंके या इसमाने जातीयवादी मानसिकतेतून महिलांनावर दगडफेक करत पाटील की ची दशहत निर्माण केली.यापुर्वीही १९९३साली या गावात मिरवणूकीवर दग
डफेक करून दलितांच्या स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा कुटील डाव याच लोकांनी केला होता.मराठ्यांचा खासदार निवडून देण्यापुर्वीच एवढी दहशत माजवत असतील तर निवडून आल्यावर जिल्ह्यातील दलित समाजाला जातीयतेच्या दहशतवादी पणामुळे गावे सोडावी लागतील असे मत डॉ.अनंत गायकवाड बसपा लोकसभाध्यक्ष यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी उपस्थित ऍड.अमोल डोंगरे जिल्हाध्यक्ष बीड, बाळासाहेब जगताप जिल्हा उपाध्यक्ष,सागर हनवते जिल्हा महासचिव व जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा