बहुजन समाज शासक -प्रशासक बनावा हे बाबासाहेबांचे स्वप्न होते होते - रानबा गायकवाड

बहुजन समाज शासक -प्रशासक बनावा हे बाबासाहेबांचे स्वप्न होते होते - रानबा गायकवाड 

परळी प्रतिनिधी.      हजारो वर्ष विषमता ,आणि जाती व्यवस्थेने ग्रासलेला बहुजन समाज या देशाचा शासक आणि प्रशासक बनावा हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले. ते परळी तालुक्यातील हाळम येथे आयोजित करण्यात आलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव गुट्टे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मिराताई सोटरे, सामाजिक कार्यकर्ते माधवराव  मुंडे ,मंचक गुट्टे ,पत्रकार विकास वाघमारे आदी उपस्थित होते .यावेळी पुढे बोलतांना रानबा गायकवाड म्हणाले की ,भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्ता ही विकासाची चावी आहे असे म्हटले होते .त्यामुळेच त्यांनी देशातील तमाम नागरिकांना खुले पत्र लिहून रिपब्लिकन पक्ष स्थापन करून त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते .एवढेच नाही तर शेड्युल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून अनेक आमदार निवडून आणले होते. त्यामुळे सत्ता ही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे रानबा गायकवाड यांनी सांगितले. 
     याप्रसंगी माधवराव मुंडे यांनी शिक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. बाबासाहेबांची जयंती नाचून नाहीतर वाचून डोक्यात घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. तर याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना शिवाजीराव गुट्टे यांनी जयंती निमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव कमिटीचे नंदराज बालाजी लांडगे ,भरत  लांडगे ,राहुल संभाजी सोटरे, गुणाजी घोडके, माणिक सोटरे,दशरथ सोटरे, समाधान सोटरे, महादेव माने, गौतम सोटरे, मारोती सावंत, पांडुरंग माने आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास हाळम येथील महिला ,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने