लोकसभेचा प्रचार तापत असतांनाच उन्हाचा पारा वाढला
परळी प्रतिनिधी. बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार तापत असतानाच उन्हाचा पारा मात्र प्रचंड वाढल्याचे दिसत आहे.निवडणुकांच्या प्रचारावर सध्या तरी उन्हाच्या पा-याने अंकुश ठेवला आहे. वाढलेल्या जीवघेण्या उन्हामुळे उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांनाही आपल्या प्रचाराच्या वेळेत मात्र बदल करावा लागत आहे.
39 बीड लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या मैदानात 41 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. परंतु बीड लोकसभा मतदार संघात
महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे,महाविकास आघाडीचे बजरंग बाप्पा सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्यात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक प्रचारात भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट ,शिवसेना दोन्ही गट आणि वंचित बहुजन आघाडीने जोर धरला आहे.
महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे,महाविकास आघाडीचे बजरंग बाप्पा सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्यात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक प्रचारात भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट ,शिवसेना दोन्ही गट आणि वंचित बहुजन आघाडीने जोर धरला आहे.
बीड जिल्ह्यात काल 3 मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर यांची अंबाजोगाई येथे प्रचंड जाहीर सभा झाली .त्यानंतर आता बीड जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आदी नेत्यांच्याही मोठमोठ्या सभा होणार आहेत .त्यामुळे हळूहळू प्रचाराची रणधुमाळी वाढताना दिसत आहे.
उमेदवार आणि पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात कामाला लागले असतानाच अचानक उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. 40°c पेक्षा अधिक तापमान गेल्याने सकाळी दहा वाजल्यापासूनच रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे. उन्हापासून उष्माघातासारखे प्रकार होऊ नयेत म्हणून नेते आणि कार्यकर्तेही स्वतःला सांभाळत आहेत. सायंकाळी सात वाजेपर्यंत उन्हाचे चटके जाणवत आहेत.
यामुळे गावनिहाय होणाऱ्या उमेदवारांच्या गाठीभेटी ,कॉर्नर सभा,बैठका, यामध्ये हे पक्षांना बदल करावा लागत आहे. विशेषतः सकाळच्या सत्रात लवकर आणि सायंकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर प्रचाराचे नियोजन केले जात आहे. दुपारच्या वेळेला आराम करण्याकडे सर्वांचाच कल दिसत आहे. प्रचारासाठी आता मोजकेच दिवस शिल्लक असल्याने या उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेने मात्र उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या प्रचारावर मात्र आपोआप नियंत्रण पडल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत विजयासाठी मात्र अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या वाढलेल्या उन्हाच्या पा-यावर मात करून लोकापर्यंत उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना पोहोचावेच लागेल.


टिप्पणी पोस्ट करा