नाय पडलं तर नाय पडलं ही भावना पराभवाकडे नेऊ शकते

नाय पडलं तर नाय पडलं ही भावना पराभवाकडे नेऊ शकते 

परळी प्रतिनिधी.       लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी बीड जिल्ह्यात जोर धरत  असतानांच प्रचार करणारे काही कार्यकर्ते मात्र यांचं मत नाय पडलं तर नाय चला पुढे  अशी भावना व्यक्त करतांना दिसत आहेत .ही भावना म्हणजे एखाद्या उमेदवाराला मताचा फटका बसून पराभवाडे सुद्धा नेऊ शकते. हे अशा प्रकारचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नसते.
    निवडणुकीत विजय मते मिळवण्यासाठी उभे राहिलेले उमेदवार जिवाचे रान करताना दिसत आहेत .गावोगावी जाऊन प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.छोट्या-मोठ्या सभांचा सपाटा लागलेला दिसतो आहे.विविध माध्यमांचा आणि तंत्रांचा वापर करून प्रचार यंत्रणा वापरली जात आहे. 
 ‌‌. परंतु सर्वच ठिकाणी उभे असलेले उमेदवार पोहोचू शकत नसतात. अशा ठिकाणी तेथील स्थानिक नेत्यावर आणि कार्यकर्त्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपविलेली असते. परंतु अनेक ठिकाणी प्रचार करणारे नेते आणि कार्यकर्ते बहुतेक आपल्याच समूहामध्ये फिरताना दिसतात .आपल्याच समूहावर विश्वास ठेवतात. अनेकां
चे मते आपल्याला पडणारच नाहीत .यांनी मतदान केलं काय आणि नाही केलं काय आपल्याला काय फरक पडणा? आपणाला बक्कळ मतदान पडणार आहे.अशा प्रकारच्या अविर्भावात वागत असतात. 
     प्रत्यक्ष मतदारांपर्यंत न पोहोचल्यामुळे जी  मते पडणार आहेत ती मतेही अशा प्रकारच्या प्रचारामुळे संबंधित उमेदवाराला पडू शकत नाहीत. शेवटी कोणत्याही उमेदवाराचा विजय हा इतर उमेदवारांपेक्षा जेव्हा जास्त मते पडतात तेव्हाच होऊ शकतो. त्यामुळे लोकशाहीतील या निवडणुक पर्वात एक- एक मत अतिशय महत्त्वाचे असते. एका मताने एखाद्या उमेदवाराचा विजय होऊ शकतो आणि एखाद्या मतानेच उमेदवाराचा पराभव होऊ शकतो.हे विसरता कामा नये.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने