महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आदर्श जयंती
14 एप्रिल रोजी जयंती दिनी सकाळी आप आपल्या वस्ती, गल्लीत, गावात आयोजित करण्यात आलेल्या विश्वरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या पंचशील ध्वजारोहण व सामुदायिक वंदनेला उपस्थित राहवे .हे आपले कर्तव्य आहे.आज आपण जे काही आहोत ते फक्त आणि फक्त डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच.
2 जयंती निमित्त सकाळच्या सत्रात येणाऱ्या व्याख्याते, प्रमुख पाहुणे यांचे संपूर्ण भाषण ऐकणे.कारण बाबासाहेबांची जयंती ही संपूर्ण जगात एक आदर्श जयंती म्हणून साजरी केली जाते.अशा भाषणांतून बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण होत असते.नवी उर्जा मिळते.
3. बाबासाहेबांची जयंती
4. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान,भीमगीते, आंबेडकरी चळवळीतील इतर सांस्कृतिक कार्यक्रम,शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत.यामुळे आपल्या तरुणांना, समाजाला दिशा मिळू शकते.
5 जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीत शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे आवाजाचे डेसीबल नियम पाळावेत.
6 मिरवणूकीत मद्य प्राशन करून कोणीही सहभागी होणार नाही याची प्रत्येकानेच काळजी घ्यावी.दारू पिऊन मिरवणुकीत सहभागी होणारांमुळे जयंतीला गालबोट लागू शकते.
रानबा गायकवाड
भीमयुगकार
जेष्ठ पत्रकार व साहित्यिक, परळी वैजनाथ, जिल्हा बीड. Mob 7020766674


टिप्पणी पोस्ट करा