परळीत अनेक घरांवर भगवे ध्वज व विविध पुस्तकांची गुढी उभारून दिला अनोखा संदेश
परळी (प्रतिनिधी):- महाप्रतापी, महामुत्सद्दी, राजधुरंधर, संस्कृत पंडित, प्रजावत्सल छत्रवीर संभाजी महाराजांना फाल्गुन आमावस्येच्या रात्री ठार मारण्यात आले असून याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी घरावर गुढ्या उभारण्याचे सांगितले जाते. मराठा- बहुजनांच्या राजाच्या वधाचा दिवस हा विजयाचा दिवस होऊ शकत नाही. त्यामुळे मराठा- बहुजनांनी आपल्या घरावर गुढ्या उभा करू नयेत. गुढीऐवजी भगवे ध्वज उभे करावेत असे आवाहन संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदी संघटनांच्या वतीने अनेक समाज प्रबोधनपर कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आले होते. या आव्हानाला आता प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
परळी शहर व तालुक्या
तील शेकडो मराठा बहुजन बांधवांनी गुढी ऐवजी भगवे ध्वज उभारल्याचे चित्र दिसत होते. अनेक मराठा, बहुजन बांधवांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा, रितीरिवाजाला मूठमाती देत चक्क गुढी ऐवजी भगवेध्वज उभे करून यंदाचा गुढीपाडवा अत्यंत वेगळ्या पद्धतीत साजरा केला.
तील शेकडो मराठा बहुजन बांधवांनी गुढी ऐवजी भगवे ध्वज उभारल्याचे चित्र दिसत होते. अनेक मराठा, बहुजन बांधवांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा, रितीरिवाजाला मूठमाती देत चक्क गुढी ऐवजी भगवेध्वज उभे करून यंदाचा गुढीपाडवा अत्यंत वेगळ्या पद्धतीत साजरा केला.
मराठा सेवा संघाचे परळी तालुका अध्यक्ष अंकुश जाधव यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले, मराठा - बहुजन महापुरुषाला ठार मारलेला दिवस हा अभिमनाचा नसून अपमानाचा आहे. लिंबाचा पाला व्यक्तीच्या मृत्यूसमयी वापरला जात असून छत्रपती संभाजी राजाच्या मृत्यूचे हे संकेत आहेत. प्रभू रामचंद्र वनवासाहून परत आल्यानंतर गुढ्या उभारण्यात आल्याचे सांगितले जाते. पण महाराष्ट्र सोडला तर हा उत्सव कुठेच साजरा केला जात नाही. समस्त बहुजन बांधवानी पालता तांब्या व महीलाची साडी अशा विकृत विचारांची गुढी उभा न करता छञपती संभाजीराजेनां आपल्या घरांवर भगवा ध्वज उभा करुन मानवंना द्यावी यासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षा पासून प्रबोधन करीत आहेत. असेही ते म्हणाले.
पुस्तकांची गुढी उभारली
ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट ते घर भुईसपाट असं म्हटलं जातं. पुस्तक वाचल्याने अथांग ज्ञान प्राप्ती होत असते. पुस्तके हे नेहमी मार्गदर्शक व दीपस्तंभ असतात. सामाजिक कार्यकर्ते ॲड. संजय फुन्ने यांच्या घरी गुढीपाडव्यानिमित्त विविध कायदे कलम विषयक माहिती असलेल्या पुस्तकांची गुढी उभारून एक अनोखा संदेश देण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा