स्मार्ट फोन, मैत्री आणि धोका
परळी ( रानबा गायकवाड ) परळीत गेल्या आठ दिवसांत मुलीचे अपहरण आणि बलात्काराच्या चार घटना घडल्या.चारही प्रकरणात आधुनिक स्मार्ट मोबाईल फोनमुळे अगोदर निर्माण झालेली मैत्री आणि या मैत्रीतून पुढे शारिरीक शोषण असेच म्हणता येईल.त्यामुळे तरुण वर्गाने आपल्या हातात असलेल्या स्मार्टफोनचा वापर विधायक कामासाठी करायचा की बलात्कार, लैंगिक शोषणाच्या गुन्हृयात अडकून आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी करायचा हे ठरवले पाहिजे.
आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातात मोबाईल फोन आला आहे.हातात असलेल्या या मोबाईलमध्ये काय नाही? एका क्षणात वाटेल ती माहिती मोबाईल स्क्रीनवर बघायला मिळते.वाचायला मिळते.ज्ञान, मनोरंजन,कला, क्रीडा, साहित्य, सिनेमा, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय , संस्कार करणारे आणि संस्कारहीन करणारे व्हिडिओ आदि सर्वच बघायला मिळते.
युट्यूबवर तर असे अनेक व्हिडिओ पडतात जे मुलांसाठी अतिशय घातक परिणाम करणारे असतात. व्हाट्सअप ,फेसबुक ,इंस्टाग्रामच्या माध्यमातून तरुण-तरुणी एकमेकाकडे आकर्षित होतात पुढे त्याचे प्रेमात रूपांतर होते आणि हेच प्रेम पुढे याच मोबाईलवरून निर्माण झालेल्या मित्र-मै
त्रिणीसाठी धोकादायक ठरत असल्याचे अलिकडच्या गुन्ह्यावरून सिद्ध होत आहे.
त्रिणीसाठी धोकादायक ठरत असल्याचे अलिकडच्या गुन्ह्यावरून सिद्ध होत आहे.
मोबाईल वरून सुरुवातीला चॅटिंग पुन्हा मैत्री आणि त्यानंतर लैंगिक शोषण अशा प्रकारे समाजात सध्या गुन्हे घडताना दिसत आहेत .या गुन्ह्यांना आवर घालण्यासाठी कायदा म्हणून पोलीस काम करतीलच. पण मोबाईल मुळे निर्माण झालेले मैत्रीचे संबंध अनैतिक संबंध पर्यंत जाऊ नयेत. आज अनेक घटना अशा उघडकीस येत आहेत .गुन्हे दाखल झालेले बघायला मिळत आहेत . गुन्हा दाखल झाल्या नंतर पश्चाताप करून घेण्यापेक्षा सावध होऊन आपण आपल्या मोबाईलचा वापर कुठपर्यंत करावा हे कळायलाच पाहिजे.


टिप्पणी पोस्ट करा