डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 18 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन - रानबा गायकवाड

डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 18 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन - रानबा गायकवाड

परळी प्रतिनिधी.       महामानव ,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त 18 एप्रिल रोजी फुले ,शाहू , आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र  दैनिक सम्राट च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती दैनिक सम्राटचे परळी तालुका प्रतिनिधी रानबा गायकवाड यांनी दिली आहे .
    याबाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की ,रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे . रक्तदानामुळे अनेकांचे जीवन वाचू शकते.तसेच विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वैचारिक , प्रबोधनात्मक तसेच सामाजिक कार्याने संपूर्ण जगात साजरी करण्यात येते .त्या अनुषंगाने फुले ,शाहू , आंबेडकरी  चळवळीचे मुखपत्र दैनिक सम्राट च्या वतीने 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वा

जता परळी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
    या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करू इच्छिणाऱ्या रक्तदात्यांनी आपली नाव नोंदणी 94 20 14 85 38,9028347358  या व्हाट्सअप क्रमांकावर करावी असे आवाहनही रानबा गायकवाड , अजयकुमार गंडले,प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे, ,बा.सो.कांबळे, पत्रकार भगवान साकसमुद्रे,पत्रकार विकास वाघमारे, चंद्रमणी वाघमारे,विद्याधर शिरसाट, सम्राट गायकवाड,विनायक काळे आदिंनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने