मसापच्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.अनिलकुमार साळवे यांची निवड
परळी प्रतिनिधी:-
येत्या 23 एप्रिल रोजी फुले
पिंपळगाव येथे मसाप शाखा माजलगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात लेखक-दिग्दर्शक डॉ.अनिलकुमार साळवे यांची निवड करण्यात आली आहे.
साहित्य सेवेतील योगदानाबद्दल डॉ.अनिलकुमार साळवे या माजलगावच्या भूमीपुत्राचा हा सन्मान आहे.आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त साहित्यिक म्हणून डॉ. अनिलकुमार साळवे सर्वपरिचित आहेत. विपुल प्रमाणात नाट्यलेखन करून त्यांनी मराठवाड्याचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचवला आहे.कविता, नाटक, एकांकिका, लघुपट, चित्रपट लेखन करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
साहित्यिक डॉ. अनिलकुमार साळवे यांना महाराष्ट फाऊंडेशन अमेरिका यांच्या वतीने मानाच्या रा. श.दातार नाटय लेखन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.डॉ. अनिलकु
मार साळवे हे समाजाच्या दुःखांनी व्यथित होणारे मूल्यनिष्ठ साहित्यिक आहेत. त्यांच्या समग्रसाहित्य लेखनात आत्मनिष्ठे पेक्षा समाजनिष्ठेचे दर्शन अधिक प्रभावीपणे घडते. त्यांची लेखणी आत्मविष्काराचे एक प्रभावी शस्त्र झाली आहे. त्यांचे लेखन समाजातील कटुता, भ्रष्टाचार, दंभ यांच्यावर प्रहार करते. माणुसकीला जागावे,जोपासावे.भांडवलशाही,गुलामगिरी नष्ट करण्यासाठी एकजुटीने हवी, हे सत्य ते निर्भीडपणे मांडतात. नवा समर्थ भारत उभारण्यासाठी हे अत्यावश्यक आहे.

साहित्य वेदनेतून जन्माला येते. स्वकोषात असणारी अनुभूती जेव्हा सामाजिक होते,तेव्हा साहित्यिकास सामाजिक भान असते तर काही लेखकांना हे भान फाडून फेकून देण्याची दाट उर्मी असते. तीरावरील सर्व विषय ती वाहत नेते.सर्वांना सामावून घेते. आणि साहित्यिकांचे हे बहुउद्देशीय,बहूस्पर्शी प्रगटीकरण एक इतिहास बनते आहे. डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या साहित्यसेवेबद्दल शिवार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद देऊन गौरविण्यात येत आहे.शिवार साहित्य संमेलनाच्याअध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल डॉ. अनिलकुमार साळवे यांचे जेष्ठ साहित्यिक आबासाहेब वाघमारे, नाटककार रानबा गायकवाड, प्रसिद्ध कवी अरुण पवार, लेखक ,दिग्दर्शक प्रा .डॉ .सिद्धार्थ तायडे, कवी बालाजी कांबळे ,सिद्धेश्वर इंगोले , कवी केशव कुकडे ,गझलकार दिवाकर जोशी ,विठ्ठलराव झिलमेवाड ,विकास वाघमारे ,नवनाथ दाने आदिंनी त्यांचें अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा