मनसेच्या मुंबई येथील गुढीपाडवा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - रवी नेमाने
परळी प्रतिनिधी. मनसेच्या मुंबई येथे 9 एप्रिल गुढीपाडवा या दिवशी होणाऱ्या शिवतीर्थावरील मेळाव्यास बीड जिल्ह्यातील मनसे सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवी नेमाने यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्ध दिलेल्या
पत्रकात रवी नेमाने यांनी पुढे म्हटले आहे की 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबई दादर येथील शिवतीर्थ मैदानावर मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य असा मेळावा आयोजित करण्यात येत असतो .याही वर्षी 9 एप्रिल रोजी सायंकाळी हा मेळावा संपन्न होणार आहे .या मेळाव्यात संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे व मनसेचे ज्येष्ठ पदाधिकारी यांचे मार्गदर्शन होणार आहे.

या मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यातून जास्तीत जास्त महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रवी नेमाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा