राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते फुलचंद कराड यांच्या लिंबोट्यात बुद्ध विहारही नाही आणि दलित वस्तीचा विकासही

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते फुलचंद कराड यांच्या लिंबोट्यात बुद्ध विहारही नाही आणि दलित वस्तीचा विकासही 


परळी प्रतिनिधी.      तालुक्यातील बहुतांश गावात बौद्ध समाजासाठी घेण्यात येणारे विविध कार्यक्रमांसाठी बुद्ध विहारे आहेत.परंतु नुकतेच भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले शरद पवार गटाचे नेते फुलचंद कराड यांच्या लिंबोट्यात बुद्ध विहारही नाही आणि दलित वस्तीचा विकासही झालेला नाही तो केंव्हा होणार असा सवाल जनतेतून होत आहे.
          विविध धार्मिक
कार्यक्रम तसेच सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ग्रामीण भागात शासनाच्या वतीने बौद्ध किंवा बहुजन वस्तीत समाज मंदिर बांधून दिले जाते.तालुक्यातील लिंबोटा ही ग्रामपंचायत गेली अनेक वर्षांपासून फुलचंद कराड यांच्या ताब्यात राहिलेली आहे.किंवा त्यांचें वर्चस्व आहे.परंतू गावातील बौद्ध वस्ती,इतर मागासवर्गीयांचा अजुनही विकास झालेला नाही.
     गावात बुद्ध विहार लवकरात लवकर करावे अशी गेल्या अनेक वर्षांपासून समाजाची महत्वपूर्ण मागणी आहे.आता ती केंव्हा पूर्ण होणार हे स्पष्ट दिसत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने