ओबीसी संकटात असतांना ताईसाहेब कुठं होत्या? बीड लोकसभेसाठी सक्षम उमेदवार देणार - प्रा.टी.पी.मुंडे

ओबीसी संकटात असतांना ताईसाहेब कुठं होत्या? 
बीड लोकसभेसाठी सक्षम उमेदवार देणार - प्रा.टी.पी.मुंडे

परळी प्रतिनिधी.       ओबीसी संकटात असतांना, ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असतांना स्वतंला ओबीसी नेत्या म्हणवून घेणाऱ्या पंकजाताई मुंडे तेंव्हा कुठे होत्या असा सवाल ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक टी .पी.मुंडे यांनी केला .बीड लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी ओबीसीचा सक्षम उमेदवार देणार असल्याचे यावेळी प्रा .टी .पी .मुंडे यांनी जाहीर केले .ते परळी येथील औद्योगिक वसाहतीत ओबीसी मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.
        यावेळी पुढे बोलताना प्रा .टी.पी.मुंडे म्हणाले की ,महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाची प्रचंड ताकद आहे .भारतीय घटनेचे शिल्पका
र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून ओबीसीला आरक्षण दिले .त्यामुळे त्यांचा विकास होत आहे .परंतु ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले तर ओबीसीचा विकास खुंटला जाईल. ओबीसी समाजाच्या मुलाबाळांच्या शिक्षण आणि नोकऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
      महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे 21 मेळावे घेण्यात आले.प्रत्येक मेळाव्यात लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.तेंव्हा सगळ्यांचेच मत निघाले की ओबीसींचा स्वतंत्र पक्ष असावा म्हणून ओबीसींचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे व आम्ही सर्वांनी मिळून ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना केली.सरकारने आमच्या ताटातला घास काढून घेण्याचा प्रयत्न केला.त्यांना ओबीसी समाज धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही.
    याप्रसंगी प्रा.टी.पी.मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघासाठी कुणाला उभे करायचे की मी उभा राहू याविषयी उपस्थितांची मते जाणून घेतली.येत्या चार दिवसांत बीड लोकसभा मतदारसंघासाठी ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार जाहीर करु असेही प्रा.टी.पी.मुंडे म्हणाले.या मेळाव्यास प्रचंड गर्दी होती.यावेळी मराठवाडा विभागातील पदाधिकारी यांना प्रा.टी.पी.मुंडे यांनी नियुक्ती पत्र दिले.
   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने