रमजान ईद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रमाणे लोकशाहीचा उत्सव सुध्दा शांततेत साजरा करा
शांतता समितीच्या बैठकीत उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांचे आवाहन
परळी (प्रतिनिधी)
परळी शहरात आगामी साजरे करण्यात येणारे पवित्र रमजान ईद, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवनी उत्सवाच्या निमित्ताने पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली शांतता कमिटीची बैठक आज 10 एप्रिल रोजी संपन्न झाली. या वेळी बोलताना उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी आपण रमजान ईद, आंबेडकर जयंती जशी साजरी करणार आहोत तशीच निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे तो सुद्धा शांततेत साजरा करावा असे आवाहन केले.
पोलीस स्टेशन परळी शहर येथे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संभाजीनगर पोलिस, शहर पोलीस व ग्रामीण पोलिसांच्या वतीने संयुक्त पणे आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उप विभागीय पोलीस अधिका
री अंबेजोगाई अनिल चोरमाले, तहसीलदार व्यंकटेश मुंडे , नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, न.प. उपमुख्याधिकारी संतोष रोडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अभिजीत राठोड तसेच संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे आणि ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी उपस्थित जयंती कमिटीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते , पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली .तसेच पोलीस निरीक्षक उस्मान शेख, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले व उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी रमजान ईद, आंबेडकर जयंती उत्सव साजरे करतानाचे नियम तसेच आदर्श आचारसंहिता याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा