परळीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पारंपारिक वाद्‌य, लेझीम पथकासह आदर्श जयंती मिरवणूकीने वेधले परळीकरांचे लक्ष

परळीत  डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पारंपारिक वाद्‌य, लेझीम पथकासह आदर्श जयंती मिरवणूकीने वेधले परळीकरांचे लक्ष 


परळी प्रतिनिधी.        महामानव ,विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वभूषण डॉ .बाबासाहेब आंबेडकर आदर्श सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या पारंपारिक वाद्य ,लेझीम पथक ,ब्रास बॅन्ड पथक व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सादर केलेल्या बाबासाहेबांच्या गाण्यावरील नृत्याने परळीकरांचे विशेष लक्ष वेधले. यात हालगी, ब्रास बँड, शालेय विद्यार्थ्यांचे समूह नृत्य, लेझिम, लाटी- काठी फिरवणे इ.चा समावेश होता.
     परळी येथील सावित्रीबाई फुले चौकातील , मिलिंद कॉलेज समोरून 14 एप्रील रोजी दुपारी3:00 वाजता भव्य अशी महात्मा जो
तिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची मिरवणूक सुरु झाली. या मिरवणूकीत म.फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो सह अनेक घोषणा देण्यात येत होत्या तसेच चौकाचौकात जयंतीनिमित्त रांगोळ्या चित्रीत करण्यात आल्या होत्या.
          डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गाण्यावर उत्कृष्टपणे  शालेय मुलींनी समुह डान्स सादर केले तर सम्राट लेझिम संघाने आपली लेझिमची कला सादर केली. तसेच मिलिंद नगर च्या मुलींचा सुद्दा लेझिम पथक आकर्षण होते.
हालगी पथकाला बऱ्याच वर्षांनी जयंतीत आपली कला दाखवायची संधीही मिळाली.
 टॉवर चौकात जून्या काळातील काठ्या फिरविण्याचा खेळ रंगात आला होता
       सदरील मिरवणूक मिलिंद कॉलेज- टॉवर- मोंढा- एक मिनार चौक मार्गे रेल्वे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे येऊन सामुहिक बुद्ध वंदनेने समारोप झाला.
     या जयंती उत्सवाच्या मिरवणूकीत परळी शहरातील सर्व जाती धर्माच्या व शहरातील सर्व भागातील लोकानी सहभाग घेतला होता.त्याबदल विश्वभूषण डॉ .बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक आदर्श जयंती उत्सव समितीच्या सुकाणू समितीच्या वतीने आभार मानले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने