डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रचारक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
परळी प्रतिनिधी महामानव ,विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती 14 एप्रिल पासून भारतासह संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात येतात 14 एप्रिल पासून सुरू झालेली जयंती ग्रामीण भागात 30 एप्रिल पर्यंत प्रत्येक गावात साजरी करण्यात येते . जयंती निमित्ताने देण्यात येणाऱ्या डॉ .बाबासाहेब आंबेडकर विचार प्रचारक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन मुख्य संयोजक जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले आहे.
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे विचारांची जयंती. डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे ज्ञानाची जयंती. डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे जयंती म्हणजे सामाजिक क्रांतीची जयंती. डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे प्रबोधनाची जयंती. डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे त्यांनी केलेल्या महान कार्याचे पुन्हा स्मरण करणे आणि त्यांच्या
पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्यांनी विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती 2024 मध्ये आपण काय केले? डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्ये आपले योगदान काय होते? डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपण कोणते सामाजिक उपक्रम राबविले? डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपण कोणते शैक्षणिक उपक्रम राबविले? डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांनी लिहिलेल्या कोणत्या ग्रंथाचे वाचन आपण केले? डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपण एखादे पुस्तक वाचले काय?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपण आपल्या मुलांना कोणते पुस्तक विकत घेऊन वाचण्यासाठी दिले? डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती 2024 मध्ये आपण कोण कोणत्या कार्यक्रमात सहभागी झालात? किंवा आपण कोणते कार्यक्रम आयोजित केले.
वरीलप्रमाणे आपण केलेल्या कामांची माहिती फोटोसह पाठवावी सोबत .आलेल्या प्रस्तावातून प्रथम ,द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे रोख रक्कम ,स्मृतीचिन्ह,प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येईल. आपली माहिती खालील व्हाट्सअप क्रमांकावर अथवा ई मेलवर पाठवावी.
संयोजक रानबा गायकवाड परळी वैजनाथ जिल्हा बीड Mob - 9420148538 7020766674
What's app number - 9420248538
Email ranbagaikwadpress1@gmail.com असे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा