डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार भारतीय समाजाला नवी दिशा देणारा - डॉ.बळीराम पांडे
छत्रपती संभाजी नगर. ( प्रतिनिधी))
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार भारतीय समाजाला नवी दिशा देणारा आहे असे प्रतिपादन डॉ.बळीराम पांडे यांनी केले.ठेवविश्वरत्न बोधिसत्व परम पुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त निशांत पार्क हॉटेल, बीड बायपास रोड येथील सोसायटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
पूज्य भंते यांच्या हस्ते पूजाविधी झाल्यानंतर,प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले डॉ.बळीराम पांडे ( अर्थशास्त्र विभाग, देवगिरी कॉलेज, छ. संभाजीनगर) यांच्या अभ्यासू अश्या भाषणाने सर्व उपासक आणि उपासि
कांचे प्रबोधन झाले. आपल्या भाषणात डॉ.पांडे म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार भारतीय समाजाला सर्वस्वी नवा पाया देणारा, नवा मानव सिद्ध करणारा, आणि नव्या समता मानवाच्या सिद्धीत आड येणाऱ्या सर्व गोष्टीचा प्रतिकार करणारा विचार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या एका वर्ण- वर्ग, जाती-धर्म, पंथासाठी नसून पृथ्वीवरील प्रत्येक मानवासाठी आहे, या देशातील बहुजनांच्या कल्याणासाठी आहे पण बहुजन समाजाला आपल्या गुलामीची, लाचारीची जाणीव न झाल्याची खंत त्यांनी मांडली. डॉ.पांडे म्हणाले,बहुजन समाजाच्या क्रांतीचा विचार बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानातच विखुरलेला आहे. बहुजन समाजाने हा विचार ओळखावा,

डॉ.बाबासाहेब यांचे मन समजून घ्यावे. बाबासाहेब कोणत्या जातीचे होते यापेक्षा त्यांच्या विचारांची जाती कोणती आहे ? ती समजून घेण्याची गरज आहे. हे जेव्हा होईल तेव्हा त्या दिवसापासून समग्र बहुजन समाज बाबासाहेबांकडे आपला 'मुक्तीदाता' म्हणून पाहायला लागेल.या भाषणाने एक नवचैतन्य निर्माण झाले, आदरणीय बाबासाहेबांचा विचार कश्याप्रकारे आत्मसात करावा व आचरणात आणावा यावर डॉ. पांडे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने विचाराच्या जयंतीचे महत्व अधोेरेखित झाले.
सदरील कार्यक्रमात जयंती समिती कार्यकारणीचेअध्यक्ष विनोद पगारे, सचिव नागेश थोरात आणि सर्व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासठी खूप मेहनत घेतली.परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा