भारतीय संविधानामुळेच नागरिकांचे हक्क आणि अधिकार सुरक्षित- रानबा गायकवाड
परळी प्रतिनिधी. भारतीय संविधानामुळे देशातील नागरिकांचे हक्क आणि अधिकार सुरक्षित आहेत त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे हे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले.ते परळी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात बोलताना केले.तर डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला.असल्याचे प्रतिपादन महापारेषण परळी विभागाचे अधिक्षक अभियंता मिलिंद बनसोडे यांनी केले.
महामानव ,डॉ .बा
बासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती परळी येथील महाराष्ट्र राज्य महापारेषण कार्यालयात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिक्षक अभियंता एम.बनसोडे होते.तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक व नाटककार रानबा गायकवाड हे उपस्थित होते .यावेळी पुढे बोलतांना रानबा गायकवाड यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक जाती धर्मासाठी काम केल्याचे सांगितले .सवर्ण समाजातील हिंदू महिलांसाठी व ओबीसी समाजासाठी त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचेही सांगितले .यावेळी अधिक्षक अभियंता बनसोडे यांनी बाबासाहेबांनी महात्मा फुलेंनी जो शैक्षणिक वसा घालून दिला त्याला कायद्याच्या चौकटीत बसवून शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून दिले प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला .

यावेळी नांदेड येथील गुरुगोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका बनसोडे मॅडम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच महिलांना आज प्रत्येक क्षेत्रात समान संधी मिळत असल्याचे सांगितले.तसेच नवीन शैक्षणिक धोरणामुळे गरीबांना शिक्षण मिळणे अवघड होणार असल्याच्या त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार करडे यांनी केले. कार्यक्रमास कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा